पुणे – कडक उन्हातही वाहतूक पोलीस राहणार ‘कुल’

कुलिंग जॅकेट आणि कॅपची भेट

पुणे – वाहतूक पोलिसांना रणरणत्या उन्हातही वाहतूक नियमन करावे लागते. कर्तव्य बजावताना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांना कुलिंग जॅकेट आणि कॅप देण्यात आली. यामुळे भर उन्हातही वाहतूक पोलीस “कुल’ राहणार आहेत.

शहरातील प्राज फाऊंडेशन यांच्यातर्फे शहर वाहतूक शाखेला बुधवारी 500 कुलिंग जॅकेट आणि कुलिंग कॅप भेट देण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज देशमुख, फाऊंडेशनच्या संचालिका परिमल चौधरी, सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, पोलीस निरीक्षक बह्मानंद नाईकवाडी, जगन्नाथ कळसकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांना वितरीत करण्यात आलेल्या जॅकेट बाहेरील तापमानापेक्षा कमी तापमान राखते. जॅकेटमधील आतल्या बाजूस एक स्प्रे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जॅकेट वजनाला हलके असून वापरण्यास सुलभ आहे. यामुळे वाहतूक पोलिसांना अवघ्या काही मिनिटांत गारवा जाणवणार आहे. “थ्री लेअर’ तंत्रज्ञान वापरून जॅकेट बनवण्यात आले आहे. प्रत्येक लेअरमध्ये “सेल्युलर’असते. जॅकेटवर बाहेरील बाजूने पाणी फवारल्यास ते आतमध्ये “सेल्युलर’पर्यंत पोहोचते. पाणी आणि “सेल्युलर’च्या क्रियेतून आतील बाजूस थंडावा निर्माण होतो.

…महापालिकेकडून 50 ब्रीथ ऍनालायझर
मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांना 50 ब्रीथ ऍनालायझर देण्यात आले आहेत. यापूर्वीदेखील 25 ब्रीथ ऍनालायझर देण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.