पुणे – पुणे शहर आणि जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे वसुबारसला सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. आज शुक्रवारी (दि. 10) धनत्रयोदशीच्या दिवशीही शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी शहरातील मध्यवर्ती भागासह इतरत्र पावसाने जोरदार हजेरी लावली.
शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान, पुण्यातील मध्यवर्ती भाग, पेठ परिसर, धनकवडी, कात्रज, आंबेगाव, न्हरे, कोंढवा, धायरी अशा विविध भागात एक तासाहून अधिक काळ पावसाने हजेरी लावली. अवेळी आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पुणे आणि परिसरात अद्यापही जोरदार पाऊस बरसत आहे.
Heavy Rain In Pune: धनत्रयोदशीला पुण्यात पावसाची जोरदार हजेरी pic.twitter.com/0O6IO63Ijk
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 10, 2023
दरम्यान, राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली आहे. या अवेळी पावासमुळे नागरिकांची तारांबळ उडत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि परिसरामध्ये पवासाने हजेरी लावली होती. दरम्यान, आजही राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मराठवाड्यामध्येदेखील ढग दाटून आले होते. गुरुवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मराठवाड्यातही तुरळक पावसाच्या सरी कोसळ्या होत्या.