पुणे – यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जून महिन्यात कमी आणि जुलै कोरडा जाण्याची शक्यता असली तरी भारतीय हवामान खात्याने जाहीर केलेल्या यंदाच्या मान्सूनच्या अंदाजानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये गेल्या वर्षी प्रमाणेच जास्त पाऊस पडेल.
देशभरात जरी एकूण पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असला तरी विविध राज्यांमध्ये त्याचे वितरण वेगळे असणार आहे.त्यात ओडिसा, पश्चिम बंगाल आणि मिझोराम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि तमिळनाडूच्या भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.