लॉस एंजेलिस – करोनापासून बचाव करण्यासाठी वापरले जाणारे एन-95 मास्क निर्जंतुक करण्यासाठी उष्णतेचा उपयोग केला जाऊ शकतो, असे अभ्यासाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारे उष्णतेने तापवून निर्जंतुक केलेल्या मास्कची फिल्टर क्षमतेमध्ये 50 टक्के वाढ होऊ शकते, असेही अभ्यासकांनी म्हटले आहे. या अभ्यासकांमध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापिठातील अभ्यासकांचाही समावेश आहे.
कोविड-19 चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनच एन 95 मास्कचा तुटवडा जगभरात जाणवायला लागला आहे. करोनाच्या साथीच्या काळात या एन 95 मास्कचा सर्वाधिक वापर आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच केला जातो.
मात्र या मास्कच्या कमतरता असल्यामुळे अनेकजणांना एकच मास्क वारंवार वापरावा लागतो आहे. त्यासाठी हा मास्क योग्यप्रकारे निर्जंतुक करण्याची आवश्यकता भासते आहे. “एसीएस नॅनो’ या विज्ञानविषयक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात एन 95 मास्क निर्जंतुकीकरण करण्याच्या अनेक पद्धतींची चाचणी घेण्यात आली,
हे मास्क गरम केल्याने त्यांची निर्जंतुकीकरण करून फिल्टरची क्षमता 50 पट जपली जाते. एन 95 मास्कमध्ये मेल्टब्लाउन पॉलीप्रॉपिलिन फायबरचा थर असतो. त्यामुळे सछिद्रयुक्त, श्वास घेण्यायोग्य नेटवर्क बनविले जाते. छिद्रांमधून जाणारे लहान कण पकडण्यासाठी, तंतूंमध्ये विद्युत भार निर्माण केला जातो.
“यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ने एन 95 मास्क निर्जंतुकीकरणासाठी उष्णता, अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्ग आणि ब्लीचच्या वापरासारख्या अनेक पद्धती सुचवल्या आहेत.