नवी दिल्ली -भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी 85 जवानांना करोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे त्या निमलष्करी दलातील करोनाबाधितांची संख्या आता 154 इतकी झाली आहे.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये बुधवारी बीएसएफच्या 30 जवानांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. ते जवान दिल्लीतील ड्युटीवरून परतले होते. बीएसएफशी संबंधित करोनाबाधितांचे सर्वांधिक प्रमाण दिल्ली आणि त्रिपुरात आहे. दिल्लीत असलेल्या बीएसएफच्या तुकड्यांमधील 60 हून अधिक जवानांना करोनाबाधा झाली आहे.
तर त्रिपुरातील बीएसएफच्या 37 जवानांना करोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, करोनाबाधित आढळल्याने दिल्लीतील बीएसएफ मुख्यालयाचे दोन मजले दोन दिवसांपूर्वी सील करण्यात आले होते. तेथील कामकाज बुधवारपासून नियमितपणे सुरू करण्यात आले.