तामिळनाडू – आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. याचा सर्वांनाच अनुभव आहे. मात्र याचा प्रत्यय तामिळनाडूमध्ये आला आहे. एका आईने आपल्या मुलाची कॉलेजची फी भरण्यासाठी चक्क जीव दिल्याची घटना घडली आहे. मृत्यूनंतर मुलाला भरपाई मिळेल आणि त्याला कॉलेजची फी भरता येईल. यासाठी या आईने चक्क चालत्या बससमोर उडी घेतली. यात या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
बस समोर उडी मारलेल्या महिलेचे नाव पापथी असे असून त्या 45 वर्षांच्या होत्या. तसेच त्या जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. महिला 15 वर्षांपूर्वी आपल्या पतीपासून वेगळी झाली होती आणि एकटी मुलाला सांभाळत होती. मात्र मुलाच्या शिक्षणाचा ताण असल्याने या महिलेने बस समोर उडी घेतली. यात तिचा मृत्यू झाला. या महिलेला कोणीतरी रस्ते अपघातात मृत्यू झाला तर सरकार तिच्या कुटुंबाला भरपाई म्हणून पैसे देईल, असे सांगितले असल्याचे म्हंटले जात आहे. यामुळे तिने मुलाला भरपाई मिळेल या हेतूने आपला जीव गमावला.
A mother in India kills herself jumping in front of a bus, hoping for family to get government assistance due to her death, so her son can pay the college fee. pic.twitter.com/jElX596vBu
— Ashok Swain (@ashoswai) July 17, 2023
आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी तामिळनाडू सरकारकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी महिलेनं 28 जून रोजी चालत्या बससमोर उडी मारली. धक्कादायक म्हणजे पापथीने एकाच दिवशी दोन वेळा रस्ते अपघातात जीव देण्याचा प्रयत्न केला होता. महिलेने पहिल्यांदा बससमोर उडी मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला दुचाकीने धडक दिल्याचे बोलले जात आहे. काही वेळाने तिने पुन्हा प्रयत्न केला आणि बसच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात महिला बस येताच त्यासमोर जाऊन उडी घेताना दिसते.