मुंबई – भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोमय्या यांच्या या व्हिडीओनंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहे. यानंतर याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी या व्हिडीओवरून जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते संतापले म्हणाले,’ त्यांनी आधी विचारलं कोण किरीट सोमय्या? तसेच प्रकाश आंबेडकर प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाले, कोणाचंही नाव घ्यायचं आणि तुमचा टीआरपी वाढवायचा, असं सगळं सुरू आहे. रस्त्यावर दिगंबर साधू फिरतात ना, त्यांचे हवे तितके फोटो काढा आणि दाखवा तुमच्या टीव्हीवर, टीआरपीसाठी…’असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, सोमय्या यांचा सोमवारी (दि.17) अश्लील व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने दाखविल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत. दुसरीकडे इतर नेत्यांवर वारंवार आरोप करण्याची ख्याती असलेल्या सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, तेही विरोधकांच्या रडारवर आले आहेत.