मुंबई – शिना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी पिटर मुखर्जी याने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जाची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. सीबीआयने बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतल्याने अर्जाची पुढील सुनावणी 8 मे रोजी सुटीकालीन न्यायालयासमोर घेण्याची निश्चित केले.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पिटर मुखर्जीची बायपास सर्जरी झाली असून तुरुंगात आजारपण बळावण्याची शक्यता असल्याने आपल्याला जामीन द्यावा, अशी विनंती करणारा अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी पीटर मुखर्जीच्या वतीने ऍड. मिलिंद घाग यांनी पीटर यांच्यावर नुकतीच बायपास सर्जरी झाल्याने अशा अवस्थेत कारागृहात ठेवल्यास जंतूसंसर्ग होऊन जिवितास धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त केली. यावेळी सीबीआयने अर्जाला विरोध करून प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयाने याची दखल घेवून अर्जाची सुनावणी 8 मे रोजी सुटीकालीन न्यायालयालयासमोर निश्चित केली.