महाराष्ट्र दिन शासकीय सोहळ्याची

शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम
मुंबई – महाराष्ट्र दिनी साजऱ्या होणाऱ्या मुख्य शासकीय सोहळ्याची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी लोहमार्ग पोलीस दल, वाहतूक पोलीस दल, महापालिका सुरक्षा दल, ब्रास बॅंड पथक, सशस्त्र पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस दल आदी दलांनी संचलनाची रंगीत तालीम केली. यावेळी अग्निशमन दलाच्या वाहनांच्या सादरीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली.

यावेळी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात राज्य राखीव पोलीस बल, मुंबई अग्निशमन दल व बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल (महिला) या शासकीय सेवेतील पथकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. शालेय पथकांमध्ये भारत स्काउट आणि गाईडस्‌ (मुली) यांनी प्रथम, तर आरएसपी (मुली), रुस्तमजी इंटरनॅशनल हायस्कूल, दहिसर यांनी दुसरा क्रमांक पटकावला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.