मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री “रिया चक्रवर्ती’ला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
यातच आरोपी रियाच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रियाच्या जामीनावर बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र,ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार, ही सुनावणी आज गुरुवारी होणार आहे, अशी माहिती रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी दिली.
दरम्यान, जर या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती.