मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणार महाराष्ट्राचा सुपरस्टार ‘सुबोध भावे’ याने नुकतंच आपलं ट्विटर अकाउंट डिलीट केलं आहे. सुबोधने सोशल स्वतः मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची अधिकृत घोषणा केली.
सुबोध भावे म्हणाला कि, “आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र जय हिंद!’ या आशयाचे ट्विट सुबोधने केले आहे.
आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद.
मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे.
काळजी घ्या ,मस्त रहा!
जय महाराष्ट्र
जय हिंद🙏🙏🙏— Subodh Bhave (@subodhbhave) September 23, 2020
दरम्यान, सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सुबोध भावेने अचानक अकाऊंट डिलीट करण्यचा निर्णय का घेतला असावा? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनाही पडला होता. मात्र त्याने आपल्या चाहत्यांचा हा संभ्रमही दूर केला आहे. एकूणच वाढत्या नकारात्मकतेमुळे हे अकाऊंट तो डिलीट करत असल्याचे समजते. मात्र, व्यतिरिक्त आणखी कुठलेही कारण अद्याप समोर आलेले नाही.