सर्वोच्च न्यायालयात उद्या मराठा आरक्षणावर सुनावणी

मुंबई दि (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासंदर्भात उद्या, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य शासनाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची नमणूक करण्यात आली असून प्रशासकीय पातळीवरून सर्वोतोपरी तयारी केली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीसाठी राज्य शासनाने माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या नेतृत्वाखाली विधिज्ञांची नेमणूक केली आहे. रोहतगी यांच्याबरोबरच ज्येष्ठ विधीज्ञ परमजितसिंग पटवालिया, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी, राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात नियुक्त केलेले विधीज्ञ निशांत कटणेश्वरकर, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन,मुंबई उच्च न्यायालयातील विधीज्ञ ऍड. सुखदरे, ऍड. अक्षय शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, विधी व न्याय विभागाचे सचिव (विधी विधान) राजेंद्र भागवत, सहसचिव गुरव हे सर्वजण सहाय्य करणार आहेत.

शासनाने नियुक्त केलेल्या विधिज्ञांनी यासंदर्भात संपूर्ण तयारी केली असून प्रत्यक्ष हजर राहून आरक्षणासंदर्भात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)