नारायणगाव – जागतिक महिला दिनाचे ( International Women’s Day) औचित्य साधून ग्रामपंचायत वारूळवाडी मार्फत महिलांसाठी सोमवार (दि ११ मार्च) रोजी आरोग्य शिबीर व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी शून्य कचरा निर्मिती या विषयावर अर्चना मोरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य शिबिरात डॉ. मधुबाला विकास डेरे व डॉ. विकास डेरे व सहकारी यांनी मार्गदर्शन करून तपासणी केली.
या तपासणीत महिलांचे हिमोग्लोबिन, मधुमेह तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत वारूळवाडी मार्फत केंद्र पुरस्कृत १५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत महिलांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून त्या प्रशिक्षणासंदर्भात वैशाली मानकर यांनी माहिती देऊन महिलांची नावनोंदणी करण्यात आली.
सदर कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच लकी ड्राॅ च्या माध्यमातून महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच रेखा फुलसुंदर, सदस्या ज्योती संते, सोनल अडसरे, मीना वारुळे, स्नेहल कांकरिया, सदस्य देवेंद्र बनकर, विनायक भुजबळ, नारायण दुधाणे,विकास फुलसुंदर, जिजाबाई महिला पतसंस्थाच्या संस्थापक राजश्री बोरकर, चेअरमन योगिनी खैरे, रुख्मिणी भिमाजी सोनवणे, छाया भुजबळ, शुभांगी फुलसुंदर, जुई बनकर, मंदा फुलसुंदर, माधुरी बनकर, वैशाली मानकर, पल्लवी भुजबळ, छाया वाणी, यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना उपसरपंच रेखा फुलसुंदर यांनी केली. सरपंच राजेंद्र मेहेर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन किरण गुंजाळ यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.