पुणे – मुलगी झाल्यानंतर सासरवाडीला गेलेल्या जावयावर शेजारच्यांनी लाकडी दांडक्याने हल्ला केला. यामध्ये जावयाचा डोके फुटले असून तिघा जणांविरुध्द चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद सनके, विजय घाग, दत्ता कांबळे (गणेश खिंड रस्ता) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अमोल गालफाडे(25, रा.कर्वेनगर) यांना मुलगी झाल्याने ते चुलत भावासह सासूच्या घरी दुचाकीवर आले होते. तेथे त्यांनी आरोपींच्या बंद घरापुढे दुचाकी लावली होती. या कारणातून त्यांच्यात वाद होऊन आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने डोके फोडले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.