Shreyanka Patil and Virat Kohli – महिला प्रीमियर लीगमध्ये 21 वर्षीय फिरकीपटू श्रेयंका पाटीलने आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. श्रेयंकाच्या गोलंदाजीमुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्रथमच चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरला. डब्लूपीएलच्या दुसऱ्या सत्रात श्रेयंका सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज होती आणि त्यासाठी तिला पर्पल कॅप देखील मिळाली.
या कामगिरीनंतर श्रेयंकाने अनुभवी खेळाडू विराट कोहलीचीही भेट घेतली. विराटला भेटल्यानंतर श्रेयंका खूप आनंदी दिसली व तिने विराटसोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून व्यक्त केला.
श्रेयंकाने ट्विट करत लिहिले की, ‘विराटला पाहत मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मी त्याच्यासारखी होण्याचे स्वप्न पाहत मोठी झाले. काल रात्री जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा, त्याने श्रेयंका तू खूप चांगली गोलंदाजी केलीस, असे म्हटले. म्हणजे त्याला माझे नाव माहित आहे,’ असे ट्विट तिने केले.
Started watching cricket cos of him. Grew up dreaming to be like him. And last night, had the moment of my life. Virat said,
“Hi Shreyanka, well bowled.”
He actually knows my name 😬😬😬#StillAFanGirl #rolemodel pic.twitter.com/z3DB0C8Pt0— Shreyanka Patil (@shreyanka_patil) March 20, 2024
श्रेयांकाला आरसीबीने गेल्या वर्षी पहिल्या WPL लिलावात तिच्या मूळ किंमतीत म्हणजे 10 लाख रुपयात करारबध्द केलं होतं. श्रेयंका पाटील ही मूळची कर्नाटकची आहे. ती ऑलराऊंडर असून तिनं भारतीय महिला संघात देखील प्रतिनिधीत्व केलं आहे.श्रेयंका पाटील हिनं डब्ल्यूपीएलच्या दोन्ही सीझनमध्ये पर्पल कॅप मिळवली आहे. श्रेयंका पाटील हिनं यंदाच्या डब्ल्यूपीएलमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत.