नवी दिल्ली – खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने केलेला कर्ज पुरवठा 25 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. बँकेने म्हटले आहे की, 31 मार्च 2024 पर्यंतची ही आकडेवारी आहे. 31 मार्च 2023 पर्यंत एचडीएफसी बँकेने 16.14 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला होता. (HDFC Bank’s loan supply increased)
त्यामध्ये आता 55.4% ची वाढ झाली असल्याचे दिसून येते. वार्षिक आणि तिमाही पातळीवर बँकेचा कर्जपुरवठा आणि ठेवी वाढत आहेत. आगामी काळातही आशादायक परिस्थिती असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. व्याजदर कमी झाल्यानंतर सर्वच बँकाचा कर्ज पुरवठा वाढण्यास मदत होणार आहे.