नवी दिल्ली – यावर्षी देशात मोहरीच्या पिकासाठी पोषक वातावरण होते. त्यामुळे मोहरीचे उत्पादन 12 दशलक्षणावर जाण्याची शक्यता तेल उत्पादकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. (Nutrient environment for mustard crop; There will be record production)
गेल्या वर्षी मोहरीला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षीही मोहरीला चांगला भाव मिळेल या दृष्टिकोनातून शेतकर्यांनी तब्बल दहा दशलक्ष हेक्टरवर मोहरीचे पीक घेतले आहे. त्यामुळे माहरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याचे तेल उत्पादकाच्या संघटनेने म्हटले आहे.
गेल्या काही वर्षापासून सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे माहरीचे उत्पादन वाढत आहे. 2021 मध्ये मोहरीचे आठ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. तर 2023 मध्ये नऊ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. आता यावर्षी हे उत्पादन वाढून 12 दशलक्ष टनावर जाण्याची शक्यता आहे. यामुळे मोहरीच्या तेलाचे उत्पादन वाढेल आणि भारताला तेलाची कमी आयात करावी लागेल असे सांगण्यात आले.