एचसीएमटीआर रस्त्याची फेरनिविदा काढणार

पुणे  –“एचसीएमटीआर’ (अंतर्गत वर्तुळाकार रस्ता) प्रकल्पाला पुन्हा एकदा “खो’ लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी मागवलेल्या कामाच्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने त्याची फेरनिविदा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या कामासाठी गुजरातमधील वेल्स्पन कॉर्पोरेशन लि.’ या कंपनीने प्रतिसाद दिला आहे.

“एचसीएमटीआर’ रस्त्याचे भूमिपूजन जून महिन्यात करू,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. केवळ एकाच कंपनीने निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे निकोप स्पर्धा होणार नसल्याने याची फेरनिविदा काढण्यात येणार आहे. यापुढील निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जून ते जुलै उजाडेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.