अनाथ मुलांसाठी समाजकार्य करणाऱ्या ‘सिंधुताईंना’ त्यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छाच्या….
मुंबई – सिंधूताई सपकाळ हे केवळ एक नाव नसून अनाथांच्या,उपेक्षितांच्या तसेच वंचितांचा जगण्याची नवी उमेद देणारा अखंड ऊर्जेचा प्रेरणास्त्रोत आहे.७० वर्षीय महिला आपल्या भूतकाळ विसरून प्रचंड आत्मविश्वासाने अनाथांच्या समस्यांचे निराकरण करत आहे. त्यामुळेच त्यांना ‘अनाथांच्या आई’ नावाने संबोधले जाते. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे.
“ज्यांना कोणीच नाही त्या सर्वांसाठी मी आहे” असे त्या अत्यंत प्रेमाने बोलून दाखवितात.आपण एक सामान्य स्त्री ते असामान्य माई असा त्यांचा जीवनप्रवास बघू शकतो.एक नको असलेले बालक म्हणून त्यांना काय काय सोसावे लागले हे आपण त्यांना घरातून दिलेल्या ‘चिंधी’या टोपणनावावरून अंदाज लावता येईल.दरम्यान, सिंधुताईंना २७३ राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना ‘अहिल्याबाई होळकर’ या पुरस्काराने सुद्धा गौरव केला आहे.
त्यांच्या वैयक्तिक जीवनात डोकावुन बघितल्यास त्यांनी त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या आयुष्यात किती संकटे आलीत व किती त्याचा त्रास झाला याचा आपण अंदाज लावू शकतो.अनेक वाईट अनुभवांचा तोंड देत आलेल्या माईंच्या चेहऱ्यावर आपण विलक्षण आत्मविश्वास बघून प्रेरित होऊ शकतो यात काहीच दुमत नाही..!!