#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..!

मुंबई –  बाहुबली ऍक्टर प्रभास  हा आज  23 ऑक्‍टोबर रोजी आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रभासने आपल्या करियरची सुरुवात आपल्या दमदार अभिनयाने केली असून टॉलीवूडसह बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा बनवली आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नेहमीच जादू केली आहे. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटातील डायलॉग आणि त्यांच्या अभिनयाला नेहमीच सिनेप्रेक्षक दाद देत असतात.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभास यांच्याकडे बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेक बॉलिवूड सिलेब्रिटीजने सोशल मीडियावर प्रभासला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे सोशल मीडियावर सध्या #HappyBirthdayPrabhas  ट्रेंड सुरू आहे. तर त्यांच्या सोशलमीडियावरील फॅन्सने त्यांच्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ट्विट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

या बातम्या खऱ्याच आहेत, असे त्याने स्पष्ट केले आहे. आपण दोघे चांगले मित्र आहोत, असे तो म्हणाला आहे. यापेक्षा आमच्यामध्ये काही खास रिलेशन असते. तर गेल्या दोन वर्षात आम्हाला कोणीही एकत्र बघितलेच नसते, असे प्रभास म्हणाला. बाहुबली, साहो यांनसारख्या अनेक चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रभास आपल्या बॉलिवूड फॅन्सच्या मनात त्यांचे वेगळे स्थान आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.