रावणगाव -पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रावणगाव (ता. दौंड) येथील सेवा रस्त्यालगत अज्ञात व्यक्तीने केमिकल ओतून देण्याचा प्रकार घडला आहे.
रावणगाव जवळील कांबळे वस्ती परिसरात सेवा रस्त्यालगत अज्ञातांनी वाहनातून रसायन रात्रीच्या वेळेस सोडून दिले आहे. गटारीतून हे केमिकल दोनशे फूट अंतरावर वाहत गेल्याने त्या ठिकाणचे गवत व झाडे जळून गेली आहेत.
कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील एखाद्या कंपनीने हे घातक रसायन टॅंकरद्वारे सोडले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत