संगमनेरमध्ये ‘करोना’चा कहर

* जिल्ह्यातील बाधितांची संख्या पोहचली आता तीनशेवर * जिल्ह्यात एकाच दिवसात अठरा नवे पॉझिटिव्ह रुग्ण * नगर, पारनेर, अकोले, श्रीगोंदा येथे आढळले करोनाबाधित रुग्ण

नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याला लागलेले करोनाचे ग्रहण काही सुटेना. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. रविवारी एकाच दिवशी जिल्ह्यात बारा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा 303 वर गेला आहे. त्यात संगमनेर तालुक्‍यातील सात, पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघे जण, तर अकोले तालुक्‍यातील एक जण बाधित झाला आहे. एकाच दिवसाच बारा जण आढळून आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

संगमनेर तालुक्‍यात आज एकाच दिवशी सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकट्या संगमनेरचा आकडा 94 झाला आहे. आत तालुक्‍यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि 60 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित झाली आहे. दिल्ली नाका येथील 42 वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील 65 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय पुरुष, भारतनगर येथील 70 वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पारनेर तालुक्‍यातील गोरेगाव येथील 30 वर्षीय पुरुष, भोयरेपठार येथील 28 वर्षीय पुरुष यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे त्यांना लागण झाली आहे.

नगर शहरातील झेंडीगेट येथील 54 वर्षीय पुरुषाला, तर नालेगाव येथील 58 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली आहे. अकोले तालुक्‍यातील कोतूळ येथील 48 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राशीन येथील व्यक्ती साळवण देवी भागातील एका कुटुंबाच्या संपर्कात आला होता. त्यातील दोघांना करोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. त्या दोन व्यक्तींच्या संपर्कात आले होते. त्यांच्या अहवाल आज श्रीगोंदा येथे प्राप्त झाला. त्यात संबंधित कुटुंबातील दोन जणांना कोरना झाल्याचे समोर आले, तर राशीन येथील करोनाबाधित रुग्ण ज्या रुग्णालयात थांबला होता, तेथील एका परिचारिकेला देखील करोनाची लागण झाल्याचे आज आलेल्या अहवालात उघड झाले आहे. तालुक्‍यात आता एकूण पाच रुग्ण झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.

आठ जण करोनामुक्‍त
आज सकाळी जिल्ह्यातील आठ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. नगर शहरातील चार, राहाता येथील तीन आणि संगमनेर येथील एक रुग्ण बरा झाला आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 245 इतकी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.