मुंबई – ज्या गुवाहाटीतून राज्यातील सत्तांतराची रणनिती आखली गेली त्याच गुवाहाटीत शिंदेगट पुन्हा जात आहे. कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील इतर मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जात आहेत. यावरून आता एकीकडे विरोधी नेत्यांकडून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे या गुवाहाटी दौऱ्यात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांसोबत असणार नाहीत. ते सध्या नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार नाराज असल्याचं बोललं जात आहे.
यावर आता अब्दुल सत्तार यांनी वृत्त वहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ते या चर्चांवर म्हणाले,’मी सर्वधर्म समभाव मानतो. मी दर्गा, मस्जिद, मंदीर, गुरुद्वारा अशा सर्व धर्मस्थळांना एकसारखं मानतो. तिथं जात दर्शन घेतो. कामाख्या देवीच्या दर्शनालाही मी जाईल. आज गेलो तर देवी आशिर्वाद देईल, असं नाही. त्यामुळे मी कधी ना कधी दर्शनासाठी जाईल.’ असं सत्तार म्हणाले आहे.