डायमंड लीग स्पर्धेत केली कामगिरी
ब्रसेल्स – ब्रीटनचा चारवेळचा ऑलिम्पिक पदकविजेता महंमद फराह व नेदरलॅण्ड्सची सिफन हसन यांनी डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत शर्यतीत नवे विक्रम नोंदवले.
प्रेक्षकांना प्रवेश न देता रिकाम्या मैदानावर झालेल्या या एक तासाच्या शर्यतीत फराहने एक तासामध्ये 21 हजार 330 मीटर अंतर यशस्वीपणे पार केला. त्याने इथियोपियाच्या हायले गेब्रसेलासीची 21 हजार 285 मीटरची कामगिरी मागे टाकली.
फराहने तीन वर्षांपासून अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे बंद केले होते. मात्र, यंदा करोनामुळे स्पर्धाच होत नसल्याने आगामी टोकियो ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवत या स्पर्धेत भाग घेतला.
हसन हिने महिलांच्या शर्यतीत 18 हजार 930 मीटर अंतर पार करत नवा विक्रम साकार केला. तिने 2008 साली डायर टयूनने नोंदवलेली 18 हजार 517 मीटरची कामगिरी मागे टाकली.