कोहली : एरवी काहीसं आळसावलेलं असणारं कोहली गांव सोमवारी दुपारनंतर आनंदोत्सवात न्हाऊन निघालं. तो पर्यंत गावात साऱ्यांना कळलं होतं त्यांची कन्या हरनाझ कौर संधू ही विश्वासुंदरी बनली आहे.
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी हरनाझचे पालक खूप वर्षांपूर्वी मोहलीला स्थायिक झालेत. पण गावात त्यांचे येणं जाणं चालूच असतं. शेवटी गावाचा वारस आहेत ते. हरनाझने या वर्षाच्या सुरुवातीला एक सौंदर्य स्पर्धा जिंकली होती, त्यानंतर ती आवर्जून कोहलीला आली होती. त्यानंतर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ ट्रॅक्टरवर लावण्यासाठी पोस्टरसाठी पोझही दिली होती.
तिला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी चिंता वाटत होती म्हणून तिने शेतात भांगडा करून त्याचे चित्रीकरण केवळ पाठींबा व्यक्त करण्यासाठी केले होते, करमाजित हे गावकरी आठवणींना उजाळा देतात.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही ती गावात आली होती. त्यावेळी ती म्हणाली होती, मी गुरुदासपूर जिल्ह्यातील असल्याचा मला अभिमान वाटतो. गावकरी माझ्या यशासाठी प्रार्थना करतात. त्यांना अभिमान वाटावा असं यश मिळवण्यासाठी मी प्रयत्नांची पाराकाष्ठा करिन.
हरनाझचे काका आजही कोहलीत राहतात. आणि वडिलोपार्जित जमीन कसतात. करमाजित सांगतात, ज्यावेळी अनेक दिग्गज मौन बाळगत होते त्यावेळी हरनाझ आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पुढे आली.
गावकरी केवळ तिला केवळ यशस्वी सौंदर्यवती किंवा मॉडेल म्हणून ओळखतात असे नव्हे तर तिच्या धार्मिक वृत्तीसाठीही ओळखतात. तिच्या आजोबांच्या भोग कार्यक्रमात तिने गायलेली गुरुवाणीतील भजने आजही गावकऱ्यांना आठवतात.
हरनाझने शेतकरी आंदोलनावर कोणतेही थेट भाष्य केले नसले तरी तिने ग्रेटा थनबर्ग आणि रिहाना यांनी शेतकरी आंदोलनाला दिलेला पाठींबा करणारे ट्वीट री ट्वीट केले होते.