साधना बँकेचा उपक्रम ; चेअरमन अनिल तुपे यांची माहिती
हडपसर : साधना बँकने तिच्या सभासदांच्या इयत्ता दहावी व बारावीतील पाच गुणवंत कन्यांना ‘श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बँकेच्या मुख्य कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.
इयत्ता दहावीच्या तीन व इयत्ता बारावीच्या दोन असा एकूण पाच गुणवंत मुलींना आमदार चेतन तुपे व सुकाणू समिती सदस्य दिलीप आबा तुपे यांच्या हस्ते ‘श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.अनुष्का पवार ,आर्या घुले, अदिती फरांदे, स्नेहा इंगुळकर, अनिषा चोपडे या गुणवंत विद्यार्थीनीं या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
यावेळी आमदार चेतन तुपे पाटील ,सुकाणू समितीचे सदस्य दिलीप आबा तुपे, बँकेचे चेअरमन अनिल तुपे ,व्हाइस चेअरमन आबा कापरे, संचालक सुरेश घुले, बबन मगर ,चंद्रकांत कवडे, रमेश घुले, सुभाष काशीनाथ काळभोर, सुभाष नरसिंग काळभोर, वंदना काळभोर, रोहिणी तुपे राजेश कवडे, बाळासाहेब कोळपे, बाळासाहेब गुजर, शंकर बडदे, योगेश भगत, भाऊ तुपे आदी उपस्थित होते.
इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सभासदांच्या एकोणीस मुला-मुलींनाही गौरविण्यात आले.तसेच उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या श्रद्धा सूयेळवे ,श्रीमाला सोनवणे ,समृद्धी सोनवणे ,सायली महाडिक ,योगिता भामे, ऋतुजा लोणकर, स्नेहल नानेकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
दरम्यान बँकेच्या वतीने सभासदांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. सभासदांचे हक्क, अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याविषयी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे व्यवस्थापक पद्माकर जेरे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. साधना बँकेच्या मांजरी शाखेला उत्कृष्ट शाखा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाखाधिकारी ज्योती राजू घुले यांना हा पुरस्कार स्वीकाराला. अनिल तुपे यांनी प्रास्ताविक केले. तर, आबा कापरे यांनी आभार मानले.