सासवड (प्रतिनिधी) : दिवे (ता पुरंदर) येथील हरे कृष्ण कृषी सेवा केंद्राला १० वर्ष तर भारतीय शेतकऱ्यांच्या सेवेत असलेल्या एरीज एग्रो लिमिटेड कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एरीज एग्रो लिमिटेड विद्राव्य खतांची HD उच्च घनता असलेली नामांकित कंपनी आहे. या मेळाव्यामध्ये संपूर्ण रेंजची खते कंपनीकडून उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती एरीज ॲग्रोचे राज्य प्रमुख संदीप गोतमारे यांनी दिली.
या खतांमुळे कमी मात्रेमध्ये जास्त फायदा होत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते. तसेच वाहतुकीसाठी सोपी असल्याने वाहतूक ख़र्चात देखील बचत होते. HD टेक्नोलॉजी ड्रोन फवारणी उपकरना करीता अतिशय उपयोगी आहे.
यावेळी मार्केटिंग विभागाचे प्रतिक घार्गे, टेक्निकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह निलेश सदगीर यांच्या उपस्थितीत उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन हरे कृष्ण कृषी सेवा केंद्राचे प्रमुख नितीन जाधव यांनी केले होते. या मेळाव्यामध्ये HD 11.52.00. HD 19.19.19.HD 00.52.34. HD 20.20.20.HD 00.00.50. या खतांच्या सिरीज उपलब्ध आहेत