नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात वेदना होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना इन्फेक्शन झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, त्यापूर्वी सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील दोन आरोपींचा खात्मा केल्याबद्दल मान यांनी पोलीस आणि गॅगंस्टर विरोधी दलाचे अभिनंदन केले होते. पंजाबी गायक आणि कॉंग्रेस नेता मुसेवाला याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येतील दोन आरोपी जगरूप सिंह रूपा आणि मनप्रित सिंह यांचा काल खात्मा करण्यात आला. त्यांच्याकडून एक एके 47 आणि अन्य काही शस्त्रे आढळून आली होती.