मुंबई – हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याच्या जुन्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) परतल्यानंतर इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.IPL 2024 लिलावापूर्वी, रविवारी, सर्व फ्रँचायझींनी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली, ज्यामध्ये गुजरात टायटन्सने (Gujrat Titnes) प्रथम हार्दिक पांड्याला रिटन केले.
यानंतर लवकरच मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला मिळवण्यासाठी कॅमेरॉन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला ट्रेड केले, ज्याने त्याच्या खात्यात 17.5 कोटी रुपये आणले आणि अशा प्रकारे हार्दिक त्याच्या जुन्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. दरम्यान, मुंबई इंडियन्समध्ये (MI) परतल्यानंतर हार्दिकची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.(IPL 2024)
हार्दिक पांड्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये 2015 मध्ये आयपीएलमध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सने खरेदी केलेला हार्दिक दिसत आहे. याशिवाय हार्दिकने जुन्या फ्रँचायझींसोबत घालवलेले सर्व क्षण शेअर केले. यावेळी त्याने व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. मुंबई. वानखेडे. पलटन. मुंबईत परतल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. OneFamily असा हॅशटॅग देखील त्याने यावेळी वापरला आहे.
View this post on Instagram
हार्दिक पांड्याची आयपीएल कारकीर्द
हार्दिक पांड्याने आयपीएल 2023 मध्ये एकूण 16 सामने खेळले आणि 346 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 2 अर्धशतके झळकावली. 2022 मध्ये हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले. तर हार्दिकने 2015 ते 2021 या कालावधीत मुंबई इंडियन्ससाठी 1476 धावा केल्या आहेत.