मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान भलेही मुस्लिम असेल, पण ती हिंदू धर्मालाही खूप महत्त्व देते. अनेकदा अभिनेत्री भगवान शिवाची पूजा करताना दिसतात. तर आता अलीकडेच तिने जम्मू-काश्मीरमधील ‘अमरनाथ’ धामला भेट दिली आहे. ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री हातात काठी घेऊन अमरनाथ यात्रा करताना दिसत आहे.
अमरनाथ धामवरून समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये सारा अली खानने निळ्या रंगाचा ट्रॅक सूट घातला आहे आणि तिचे केस बांधले आहेत. यासोबतच अभिनेत्रीने गळ्यात लाल चुणरीही घातली आहे. व्हिडिओमध्ये सारासोबत मोठा जमाव फिरताना दिसत आहे. याशिवाय काही पोलिसही अभिनेत्रीच्या संरक्षणात तिच्यासोबत फिरत आहेत. सध्या तिचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे.
यापूर्वी साराने सोनमर्गमधील तिचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती डोंगरांच्या चहाचा आस्वाद घेतानाही दिसली होती. त्यासोबतच साराने तेथील मुलांसोबत क्लिक केलेले फोटोही पाहायला मिळाले होते. या फोटोंमध्ये सारा काळ्या पँटसह कलरफुल्ल जॅकेट परिधान करून अतिशय सुंदर दिसत होती.
दरम्यान, सारा अली खान शेवटची ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटात अभिनेता विकी कौशलसोबत दिसली होती. या चित्रपटात दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगले कलेक्शन केले होते.