पुणे : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदा आणि आयसीसी टी20 क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान मिळवणार्या शेफाली वर्मा आज आपला 18वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये पदार्पण करुन अवघी दोन वर्ष पूर्ण करणार्या शेफालीने आतापर्यंतच्या छोट्याश्या कारकिर्दीत आपल्या स्फोटक फलंदाजीने अनेक किर्तीमान स्थापन केले आहेत.
शेफालीच्या वाढदिवसानिमित्त या लेखातून तीच्या खास विक्रमांवर नजर टाकणार आहोत.
1) लहान वयात मोठा पराक्रम
हरियाणाची शेफाली भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक झळकावणारी सर्वात तरुण सलामी फलंदाज ठरली. महिलांसोबतच पुरुषांच्या क्रिकेटमध्येही हा विक्रम आहे. शेफालीने 17 वर्षे 140 दिवसांच्या वयात हा चमत्कार केला. यासह तिने सहकारी फलंदाज स्मृती मानधनाचा विक्रम मोडला. मंधानाने 2014 साली 18 वर्षे 28 दिवस वयाच्या इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.
2) पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावांत अर्धशकते करणारी एकमेव भारतीय
युवा सलामीवीर शेफाली वर्मा पदार्पणाच्या कसोटीत सामन्याच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. तर अशी कामगिरी करणारी शेफाली जगातील चौथी महिला फलंदाज ठरली आहे. 17 वर्षीय महिला क्रिकेटर शेफालीने 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात 96 धावा केल्या होत्या. तर दुसर्या डावात 55 धावांची खेळी केली होती.
शेफालीपूर्वी, ही कामगिरी इंग्लंडच्या लेस्ली कुक (72 आणि 117, विरुद्ध भारत, 1986), श्रीलंकेच्या व्हेनेसा बोवेन (78 आणि 63, विरुद्ध पाकिस्तान, 1998) आणि ऑस्ट्रेलियाच्या जेफ जॉन्सन (99 आणि 54, विरुद्ध इंग्लंड, 2021) यांनी केली होती.
3) तिन्ही प्रकारात पदार्पण करणारी तरुण क्रिकेटपटू
सलामीवीर शफाली वर्मा 27 जून 2021 रोजी इंग्लंड विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना खेळताच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पदार्पण करणारी सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरली. शेफालीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी 17 वर्षे आणि 150 दिवस घेतले.
क्रिकेच्या तिन्ही प्रकारात सर्वात कमी वयात पादर्पण करणार्या खेळाडूंमध्ये अफगाणिस्ताचा मुजीब उर रहमान अव्वल स्थानी आहे. रहमानने 17 वर्षे 78 दिवसांच्या वयात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्यानंतर इंग्लंडची सारा टेलर (17 वर्षे 86 दिवस), ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी (17 वर्षे 104 दिवस) आणि पाकिस्तानचा मोहम्मद अमीर (17 वर्षे 108 दिवस) यांचा क्रमांक लागतो. तर यामध्ये शेफली पाचव्या स्थानी आहे.
4) वयाच्या 15 व्या वर्षी टी20 पदार्पण
2019 मध्ये शेफाली वर्माने अवघ्या 15व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 सामना खेळत सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळण्याचा विक्रम केला. पुढे नोव्हेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मध्ये अर्धशतक झळकावणारी शेफालीचे सर्वात तरुण फलंदाज ठरली.
5) सचिनची फलंदाजी पाहून क्रिकेटपटू होण्याचा निर्णय
शेफाली वर्माचा जन्म 28 जानेवारी 2004 रोजी रोहतक, हरियाणा येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव संजीव वर्मा आहे. शेफालीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. एकदा रोहतकमध्ये रणजी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यात सचिन तेंडुलकर देखील होता. शेफाली तो सामना बघायला गेली होती. त्या सामन्यात सचिनची फलंदाजी पाहून शेफालीने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्याचा निर्णय घेतला.