मुंबई – अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच चर्चेत असते. कधी ती आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत असते तर कधी एखाद्या गॉसिपमुळे. आता पुन्हा एकदा उर्वशी चर्चेत आली आहे. मात्र यावेळेसचे चर्चेचे कारण तिचे फॅन्स आहेत. फॅन्सने केलेल्या कमेंटमुळे उर्वशीच्या क्रश बाबतच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.
अभिनेत्री उर्वशी रौतेला तिचा 29 वा वाढदिवस साजरा केला. तिने आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी तिने ‘वाढदिवसाची शाईन’ असे कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.
फोटोंमध्ये फुग्यांनी सजवलेले घर, मल्टी-कलर केक देखील दिसत आहे. फोटोंमध्ये उर्वशीने वन पीस ड्रेस परिधान केला आहे. तिच्या हातात फुलांचा गुच्छ देखील आहे यासोबत तिच्या चेहऱ्यावर जन्म दिवसाचा आनंद देखील दिसत आहे.
या फोटोंवरुनच अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. एकाने लिहिले आहे की, ‘पिंक कलर मुलींना किती आवडतो.’ तर दुसऱ्याने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे लिहिले आहे. तर आणखी एकाने ‘हॅप्पी बर्थडे मिसेस पंत अशी कमेंट केली आहे. खरंतर उर्वशी आणि क्रिकेटर रिषभ पंत यांचा तसा काहीही संबंध नाही मात्र चाहते वारंवार उर्वशीला चिडवताना दिसून येतात.
या आधी देखील उर्वशी रौतेला ऋषभ पंतसाठी प्रचंड ट्रोल झाली होती. उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ऋषभ पंत रात्रभर हॉटेलच्या लॉबीमध्ये तिची वाट पाहत होता. यावर प्रतिक्रिया देताना ऋषभ पंत म्हणाला होता की, प्रसिद्ध होण्यासाठी काही लोक काहीही बोलतात. तेव्हापासून फॅन्स नेहमीच उर्वशीला रिषभच्या नावावरून चिडवताना दिसून येतात.