चिंबळी -देहूरोड येथील एम. ई. एस. इंडस्ट्रीयल वर्कस को ऑफ सोसायटीचे अध्यक्ष हनुमंत कातोरे 37 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष संतोष मोकाशी, उपाध्यक्ष सुदाम चौधरी, शोभा काळे, सचिव रवींद्र चौधरी यांच्या हस्ते कातोरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
हनुमंत कातोरे हे चिंबळी (ता. खेड) येथील प्रगतशील शेतकरी व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष व माजी सरपंच रामचंद्र कातोरे यांचे चिरंजीव तर पोलीस कॉस्टेबल कैलास कातोरे, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.