नागपूर – नागपुरात राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. यासाठी पोलीसांकडून काही अटींसहित परवानगी सुद्धा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणासाठी घराबाहेर पडलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज 36 दिवसांनी अमरावतीत परतणार आहे. मात्र त्यापुर्वी राणा दाम्पत्य नागपूरात हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत. दरम्यान यावेळी पत्रकरांशी बोलतांना नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या’दिल्लीत आम्ही हनुमान चालिसा पठण केलं, रॅली काढली त्यावेळी तिथे सुरक्षा व्यवस्था होती. इथे महाराष्ट्रात रामाचा विरोध, हनुमान चालिसाला इतका विरोध का होत आहे.? असा प्रश्नही राणा यांनी उपस्थित केला त्या पुढे म्हणाल्या,’आज शनिवार आहे. महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झालाच पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हनुमान चालिसा पठण करत आहोत.’ असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केली.
दरम्यान त्याच मंदिरात राष्ट्रवादीसुद्धा हनुमान चालिसा पठण करणार आहे. राणा दाम्पत्य नागपुरात परतल्यावर रामनगर परिसरातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहे. त्याच मंदिरात राष्ट्रवादीकडून हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी पोलीसांची परवाणगी सुद्धा मिळाली आहे. पोलीसांनी यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. असे जरी असले तरी राणा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.