पुणे – महापारेषण कंपनीची फुरसुंगी ते कोथरूड या 132 केव्ही टॉवर लाईनद्वारे कोथरूड 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान बिबवेवाडी परिसरात फुरसुंगी ते कोथरूड टॉवर लाईनची उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येणार आहे.
सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या टॉवर लाईनची उंची वाढविण्यात येत आहे. या कामामुळे महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहणार असल्याने महावितरणच्या 7 उपकेंद्रांचा सुद्धा वीजपुरवठा बंद राहणार आहे. तथापि महावितरणकडून 21 वीजवाहिन्यांसाठी इतर उपकेंद्रांच्या माध्यमातून पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार असली तरी कोथरूड, वारजे व डेक्कनमधील काही भागांत वीजपुरवठा बंद राहणार आहे.