इस्लामाबाद – पाकिस्तान मधील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस जास्तच बिकट होत चालली आहे. त्यातही पाकिस्तानची परकीय चलनाची गंगाजळीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा थेट परिणाम हज यात्रेवर झाला असून हज यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येमध्ये तब्बल दहा टक्के घट झाली आहे.
पाकिस्तानमध्ये दरवर्षी हज यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्या नागरिकांचा जो कोटा असतो त्यापैकी दहा टक्के कोटा आता सौदी अरेबियाकडे वर्ग करण्यात आला आहे. साहजिकच पाकिस्तानमध्ये यावेळी 8000 पेक्षा जास्त नागरिकांना हज यात्रा करता येणार नाही. पाकिस्तानच्या तिजोरीमध्ये पुरेसे परकीय चलनच उपलब्ध नसल्याने त्यांनी हज यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना स्वतःहून परकीय चलनाची व्यवस्था करावी असे सांगितले होते.
अनेक नागरिकांना ते शक्य झाले नाही, त्यामुळे त्यांनी हज यात्रेसाठी नोंदणी केली नाही. ही गोष्ट लक्षात आल्यावर पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने आपल्या बैठकीमध्ये हज यात्रेसाठी पाकिस्तानचा जो कोटा असतो तो सौदी अरेबियाला देण्याचा निर्णय घेतला. हज यात्रेच्या व्यवस्थेसाठी पाकिस्तान सरकारने 16 कोटी तीन लाख डॉलर्सचे आर्थिक नियोजन केले होते;
पण एवढा परकीय निधी उपलब्ध करणे शक्य नसल्यानेच अनेक नागरिकांना त्यांनी यापैकी निम्मी रक्कम तरी स्वतःहून उपलब्ध करावी असे म्हटले होते. ज्यांना अशा प्रकारे परकीय निधी उपलब्ध करणे शक्य झाले त्यांनीच हाज यात्रेसाठी नोंदणी केली नाही.