जर आपल्याला केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत माहित नाही तर कितीही महागडे तेल लावले तरी ही त्याचा काही फायदा मिळत नाही. केसांना अशा पद्धतीने तेल लावल्यावर केस मजबूत होतील. चला तर मग जाणून घेऊ या.
1 शॅम्पू करण्याच्या दोन तासापूर्वी तेल लावा नका. रात्रभर लावून ठेऊ नका.
2 केसांना तेल लावणे पुरेशे नाही. आपल्या बोटांनी वर्तुळाकार मॉलिश करा.
3 दोन तोंडी केस होतात तर या साठी केसांचा टोकाला देखील तेल लावा.
4 नारळाच्या तेलाने मॉलिश करा .या मध्ये मॅग्नेशियम,कॅल्शिअम,आयरन आणि पोटॅशियम घटक आढळतात. जे केसांना बळकट करतात.
5 100 मिली नारळाचे तेल घेऊन त्यात 3 ग्रॅम कापूर वाटून मिसळा. या तेलाचा वापर दररोज रात्री मुळात करा. कोंडा नाहीसा होईल.
उन्हाळ्यात बऱ्याच स्त्रियां केसांना मेंदी लावतात.बऱ्याच स्त्रियांना मेंदी लावल्यामुळे केस रुक्ष आणि कोरडे होण्याची तक्रार असते. या साठी आम्ही काही केसांना मेंदी लावण्यापूर्वी या मध्ये अंडी,आवळा पावडर,कॉफी सारखे पदार्थ मिसळा. या सर्व वस्त्या नैसर्गिक आहेत. या मुळे आपल्या केसांना काहीच त्रास होणार नाही. आपण अंडीच्या ऐवजी दही मिसळू शकता.
मेंदी लावण्यापूर्वी केसांना तेल लावा-
मेंदी लावण्यापूर्वी आपण केसांना तेल देखील लावू शकता आपण मोहरीचे तेल देखील केसांना लावू शकता.
मेंदी लावल्यावर केसांना धुवावे –
मेंदी लावल्यावर किमान 12 तासानंतर शॅम्पूने केस धुवावे. या पूर्वी केसांना फक्त पाण्याने धुऊन घ्या. स्कॅल्पमध्ये खाज येत असेल तर आपण अँपल साइड व्हिनेगर देखील वापरू शकता.या साठी एक कप पाण्यात अँपल साइड व्हिनेगर मिसळून घ्या आणि या पाण्याने केसांना धुऊन घ्या.
केस कोरडे केल्यावर तेल लावा-
मेंदी लावल्यावर स्कॅल्प ची तेलाने मॉलिश करा. या साठी आपण नारळाचं तेल वापरू शकता. अनेकदा मेंदी स्कॅल्प मध्ये साचते. या मुळे खाज येते. तेलाने किमान 5 मिनिटे तरी मॉलिश करा. नंतर गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो टॉवेल केसांना गुंडाळा. सकाळी केस शॅम्पूने धुऊन घ्या आणि कंडिशनर लावा.
रात्री झोपताना मेंदीचा रंग आपल्या कपड्यांना किंवा उशीला लागू शकतो . यासाठी केसांना एक सूती कापड गुंडाळून घ्या. जेणे करून मेंदीचा रंग लागणार नाही.