वॉशिंग्टन :- एच-1 बी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी अमेरिकन सरकार अर्जदारांची निवड करण्यासाठी दुसरी फेरी घेणार आहे. यामध्ये लॉटरीद्वारे अर्जदाराची निवड केली जाईल.
यूएस फेडरल इमिग्रेशन सर्व्हिसेसने (युसीस) गुरुवारी जाहीर केले की एच-1 बी व्हिसासाठी यापूर्वी सादर केलेल्या इलेक्ट्रॉनिक अर्जांपैकी पात्र अर्जदारांची निवड लॉटरीद्वारे केली जाईल. याचा सर्वाधिक फायदा भारतातील नागरिकांना होणार असल्याचे मानले जात आहे.
युसीसने 2024 या आर्थिक वर्षासाठी एच-1 बी व्हिसासाठी एक कॅम्प उघडला होता. त्यामध्ये नागरिकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. मार्चमध्ये जे अर्ज योग्य पद्धतीने सादर करण्यात आले होते, त्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ आर्थिक वर्ष 2024 साठी निवडक नोंदणी असलेले हे अर्जदार एच-1 बी कॅप दाखल करण्यास पात्र आहेत.
एच-1 बी व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. अमेरिकन कंपन्यांना विशेष व्यवसायांमध्ये परदेशी कामगारांना कामावर ठेवण्याची परवानगी या व्हिसाद्वारे दिली जाते. अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान कंपन्या भारत आणि चीनसारख्या देशांमधून दरवर्षी हजारो कर्मचारी नियुक्त करतात. अशा कर्मचाऱ्यांना एच-1 बी व्हिसाची सर्वाधिक गरज असते.
65 हजार जणांना संधी?
अलीकडेच, अमेरिकेने निर्णय घेतला की युसिस एका वर्षात जास्तीत जास्त 65,000 एच-1 बी व्हिसा जारी करू शकते. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अशा विषयांमध्ये अमेरिकन विद्यापीठात उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना आणखी 20,000 जणांना एच-1 बी व्हिसा देखील जारी केला जाऊ शकतो.