नवी दिल्ली – पाकिस्तानमधील ननकाना साहिब गुरुद्वारावर कथित लोकांनी दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. भारताने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच शिखांच्या सुरक्षिततेची मागणी केली आहे.
What the Muslim fundamentalists have done in Nankana saheb is utterly reprehensible and totally condemnable . What kind of third grade sub human and inferior quality people can behave this way with a vulnerable group of another community
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 3, 2020
दरम्यान, पाकिस्तानने या वृत्ताचे खंडन केले असून गुरुद्वारा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हंटले आहे. याठिकाणी मुस्लिम समूहाच्या दोन गटामध्ये वाद झाला. मात्र, यामध्ये तातडीने हस्तक्षेप करत मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे गीतकार – लेखक जावेद अक्तर यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की,’जे मुस्लिम कट्टरपंथियांनी केले ते निंदनीय आहे. थर्ड ग्रेड आणि कमी दर्जाचेच लोकच दुसऱ्या समुदायातील लोकांशी असा व्यवहार करू शकतात.’ असं ही जावेद अक्तर म्हटले आहे.