Gunaratna Sadavarte । राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय. । Gunaratna Sadavarte
दरम्यान, आता हे 10 टक्क्यांच मराठ्यांचं आरक्षण न्यायालयात टिकणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, अश्यातच वकील गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. त्यांनी थेट हे मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असा दावा केलाय.
तर मराठा समाज आर्थिक मागास, पण सामाजिक नाही. हे सरकार निष्ठुर आहे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर टीका केली. तर आज विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर केलं. मात्र, हे विधेयक संवैधानिक नाही. । Gunaratna Sadavarte
भारतीय राज्यघटनेच्या मुल्यांना पायदळी तुडवणारी हजारो वर्षांपासून सुरू असलेली ही गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीला तसंच ठेवणारं हे विधेयक आहे. त्यामुळंच या विधेयकामुळं आता सर्व जातीतील गुणवंतांची कत्तल होणार आहे, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणप्रश्नी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात नोकरी आणि शिक्षणात मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी 1 वाजता विधानसभेत मराठा आरक्षणाचं विधेयक सादर करून सभागृहाला संबोधित केलं.
विधानसभेत एकमताने हे विधेयक संमत झाल्यानंतर अनुक्रमे विधान परिषदेतही विधेयक संमत करण्यात आले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केलं. । Gunaratna Sadavarte