मुंबई – गुजरातमधील सुरतमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. येथे पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक हितेश जोयसर यांनी दिली.
Surat, Gujarat |On basis of inputs received by Kamrej police, an ambulance was intercepted on Ahmedabad-Mumbai road. On questioning driver & checking vehicle, 6 cartons containing 1290 packets of Rs 2000 counterfeit notes worth Rs 25.80 crores, was found: Hitesh Joysar, SP Rural pic.twitter.com/wWiItpmQpa
— ANI (@ANI) September 29, 2022
पोलीस अधीक्षक हितेश जोयसर यांनी सांगितले की, मिळलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत सुरतच्या कामरेज पोलिसांनी अहमदाबाद-मुंबई रस्त्यावर एक रुग्णवाहिका थांबवली, यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेची झडती घेतली असता वाहनाची तपासणी केली असता सहा पेट्यांमध्ये २५ कोटी ८० लाख रुपयांच्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची 1290 पाकिटे आढळून आली. पोलिसांनी चालकाची चौकशी करून नोटा जप्त केल्या.’
एसपी ग्रामीण हितेश जोयसर यांनी पुढे माहिती दिली की, नोटा बारकाईने पाहिल्यानंतर रिझर्व्ह बँक ऐवजी रिव्हर्स बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले आढळून आले. त्याचबरोबर बँक अधिकारी आणि एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.
हैदराबादमध्ये 1.24 कोटी रुपये सापडले
हैदराबादमधील आयुक्तांच्या टास्क फोर्सने एका व्यक्तीला अटक केली आहे ज्याच्याकडून 1.24 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याने पोलिसांना सांगितले की त्याच्या काकांनी त्याला इतर चार जणांमध्ये रोख रक्कम देण्यास सांगितले होते. दुसरीकडे, व्यक्ती रोख रकमेसाठी योग्य कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरली.