नवी दिल्ली : देशात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरु आहे. दरम्यान, राजकारणी मंडळी सुद्धा या उत्सवाचा आनंद घेत आहेत. दरम्यान, सध्या गुजरातमधील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. BCCI सचिव जय शाह आणि गृहमंत्री अमित शाह यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. नेटिझन्सनीही या व्हिडीओवर मजेशीर कमेंट दिल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत शाह कुटुंबीय पूजा करताना दिसत आहेत आणि त्याचवेळी अमित शाह यांनी जय शाह यांना ओरडल्याचे दिसतेय. पूजा करताना जय शाह यांचे लक्ष दुसरीकडे असल्याने वडिल अमित शाह यांनी त्यांना ओरडले.
View this post on Instagram
त्यावरून बाप तो बाप होवे है! मिडल क्लास का हो या BCCI सेक्रेटरी का! असा ट्रेंड सुरू झाला आहे.
Home Minister Amit Shah ji as Dad 😊 pic.twitter.com/JRgXGIQz98
— Rosy (@rose_k01) September 29, 2022
”आमा ध्यान दे! ( इथे लक्ष दे)” असा दम अमित शाहांनी मुलाला भरल्याचा दिसतोय… ‘_dekhbhai_’ या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याला आतापर्यंत ५० हजाराहून अधिक लाईक्म मिळाले आहेत.