मुंबई – उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.
दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला. आता ठाकरे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा ट्रेलर लाँच केलाय. याची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे टीझर ट्वीट करण्यात आलं आहे.
नेमकं काय आहे ट्विट
“शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” हा दसरा मेळावा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे.
एक नेता, एक झेंडा, एक मैदान…
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/FbulJpw2mA— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 30, 2022
दरम्यान, “एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ” असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे.
पहा टीझर
#दसरा_मेळावा_२०२२ pic.twitter.com/mCQZs6rufq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 29, 2022