Gujarat – गुजरातच्या (Gujarat) पंचमहाल जिल्ह्यातील हलोलमध्ये सोमवारी संध्याकाळी राज्य राखीव पोलिस (एसआरपी) जवानांना (police injured) घेऊन जाणारी बस उलटली.
या अपघातात 38 पोलीस (police injured) कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी 9 जण गंभीर जखमी असून 29 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. गंभीर जखमींना वडोदरा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने (police injured) सांगितले की, पावागडच्या पायथ्याशी तीन दिवसांच्या गोळीबार प्रशिक्षणात सहभागी झाल्यानंतर पोलिस दाहोदला परतत होते. प्रथमदर्शनी, ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे बस उतारावरून खाली जाऊन उलटली.