World Cup 2023 Pakistan vs Bangladesh Match Update : विश्वचषक 2023 च्या 31व्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महमदुल्ला रियाधचे अर्धशतक व लिटन दास, कर्णधार शकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने पाकिस्तानसमोर विजयासाठी 205 धावांचे माफक आव्हान ठेवले आहे.
मोहम्मद वसीम ज्युनियरने 46 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुस्तफिजुर रहमानला क्लीन बोल्ड करत बांगलादेशचा डाव संपवला. रहमानने तीन धावा केल्या. शरीफुल इस्लाम एक धाव घेत नाबाद राहिला. बांगलादेशचा संघ 45.1 षटकात केवळ 204 धावा करू शकला. बांगलादेशकडून फंलदाजीत महमुदुल्लाहने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 56 धावांची खेळी खेळली. लिटन दास 45 धावा केल्यानंतर, कर्णधार शकीब अल हसन 43 धावा करून आणि मेहदी हसन मिराज 25 धावा करून बाद झाला.
पाकिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी तीन बळी घेतले. हरिस रौफला दोन यश मिळाले. इफ्तिखार अहमद आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ICC Men's Cricket World Cup 2023
Bangladesh 🆚 Pakistan 🏏Pakistan need 205 Runs to Win
Photo Credit: ICC/Getty#BCB | #PAKvBAN | #CWC23 pic.twitter.com/zZpfU6uST7
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 31, 2023
बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रीदीने सलामीवीर तंजीद हसन व नजमुल शांतो यांना पाठोपाठ बाद केले. दुसरीकडून हॅरिस रौफने मुश्फिकुर रहीमला बाद करत त्यांची अवस्था एकवेळ 3 बाद 23 अशी बिकट केली होती. मात्र, लिटनने महमदुल्लासह डाव सावरताना संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने सावध फलंदाजी करताना एकेरी दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. या जोडीने संघाचे शतकही साकार केले मात्र, त्याचवेळी अर्धशतकाच्या जवळ आलेला लिटन 45 धावांवर परतला. या खेळीत त्याने 64 चेंडूत 6 चौकार मारले.
महमदुल्लाने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 56 धावांवर बाद झाला. त्याने 70 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावला. तो परतल्यावर आलेल्या तौहीद हिरदोयने निराशा केली. मात्र, एका बाजूने कर्णधार शकिब जबाबदारीने फलंदाजी करत होता. त्याने मेहदीसह पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला.
शकिबही अर्धशतकाच्या जवळ आलेला असताना 43 धावांवर बाद झाला. त्याने 64 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार फटकावले. मेहदीने तळातील फलंदाजांना हाताशी घेत संघाचे द्विशतक फलकावर लावले. भक्कम फलंदाजी करत 25 धावांची खेळी करणारा मेहदीही अनावश्यक फटका मारून बाद झाला. त्याने या खेळीत 30 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावला. त्याला बाद केलेल्या महमद वासीम ज्युनिअरने तस्किन अहमद व मुस्तफिजूर रेहमानला बाद केले व बांगलादेशचा डाव 46 व्या षटकांत 204 धावांवर रोखला.