‘गुजरातचे भाजप सरकार 23 मे यादिवशी कोसळणार’

वाघेला यांनी निर्माण केली सनसनाटी

अहमदाबाद – लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी (23 मे) गुजरातमधील भाजपचे सरकार कोसळेल, असा दावा करून त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी सोमवारी मोठीच राजकीय सनसनाटी निर्माण केली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या वाघेला यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना गुजरातमधील सत्तारूढ भाजपचे अनेक आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावाही केला.

भाजपमध्ये राहण्याची इच्छा नसल्याचे सांगत अनेक आमदारांनी माझी आतापर्यंत भेट घेतली. आमदारकीचा राजीनामा देण्याची त्यांची तयारी आहे. 23 मे यादिवशी ते राजीनामा देतील. गुजरात सरकार कोसळेल इतकी त्यांची संख्या आहे. त्यादिवशी भाजप केंद्राबरोबरच गुजरातचीही सत्ता गमावेल, असे ते म्हणाले. वाघेला यांचा दावा लगेचच भाजपने फेटाळून लावला. वाघेला अनेक वर्षांपासून खोटे आणि निराधार दावे करत आहेत. केवळ प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी ते तशाप्रकारचे दावे करतात, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला. गुजरातमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने जोरदार टक्कर दिल्याने विजय मिळवताना भाजपची दमछाक झाली. त्या पक्षाला काठावरच्या बहुमतावर समाधान मानावे लागले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.