गायरान जमिनी विकासासाठी वापरणार

आमदार अशोक पवार : वाडा पुनर्वसनमधील प्रश्‍न मार्गी लावणार

शिक्रापूर -वाडा पुनर्वसन गावच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष दिल्यास अनेक काम मार्गी लागू शकतील. त्यासाठी मोठा निधी देणार आहे. विकासाकडे लक्ष न घेता परिसरातील गायरान जमिनी पुनर्वसनाच्या नावाखाली हडप करण्याचा डाव मागील काळात दिसून आला आहे.

त्यावर ग्रामस्थांनी अंकुश ठेवणे गरजेचे आहे. गायरान जमीन गावच्या विकासासाठीच वापरण्याची तरतूद भविष्यात करणार आहे, अशी ग्वाही आमदार ऍड. अशोक पवार यांनी दिली.

वाडा पुनर्वसन गावठाण (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून अंगणवाडी इमारत बांधकाम, जिल्हा परिषद शाळा खोल्या दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत, मारुती मंदिर परिसर सुधारणा आदी विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समितीच्या सभापती मोनीका हरगुडे, सरपंच दर्शना नायर, उपसरपंच बाळासाहेब वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य विकास कोळेकर, सहारा तांबोळी, रामदास नायकुडे, सुषमा माळी, ग्रामविकास संतोष डफळ उपस्थित होते.

ऍड. पवार म्हणाले की, शिरुर तालुक्‍यातून शिरूर तालुक्‍यात पुर्नवसित झालेल्या वाडा पुनर्वसन करताना एसटीपी प्लॅंटसाठी जागा आरक्षित न ठेवल्याने गावाला ड्रेनेज लाइनची मोठी समस्या उभी राहली आहे.

यावर योग्य पर्याय काढत शुद्ध पाणी प्रकल्पासाठी बुजविलेले कॅनॉल खुले करण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन देत जिल्हा परिषद शाळा खोल्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.