Stock Market Today| आज गुढीपाडव्यानिमित्त शेअर बाजारात विक्रमी तेजी दिसून आली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 75 हजारांवर पोहोचला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडल्यानंतर या निर्देशांकाने प्रथमच 75000 चा आकडा पार करत इतिहास रचला. सेन्सेक्ससोबतच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज चा निफ्टी निर्देशांकही तेजीत असून ते 22,700 च्या नव्या शिखरावर पोहोचला आहे. BSE सेन्सेक्स सकाळी 75,124.28 वर उघडला आणि ही त्याची सर्वकालीन उच्च पातळी ठरली. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स 74,742.50 च्या पातळीवर बंद झाला होता.
कोणत्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ Stock Market Today|
सेन्सेक्स लिस्टेड कंपन्यांमध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा मोटर्स, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि नेस्ले यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर तोट्यात राहिले आहेत. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये, गोदरेज प्रॉपर्टीजचे शेअर्स बीएसईवर 5.85 टक्के किंवा 151 रुपयांच्या वाढीसह 2,739.40 रुपयांवर व्यवहार करत होते. याशिवाय इन्फोसिसचा शेअर 2.09 टक्क्यांनी वाढून 1508 रुपयांवर पोहोचला होता.
सेन्सेक्सचा प्रवास बघितला तर 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2004 मध्ये तो फक्त 5000 च्या आसपास होता, जो आज 75 हजार झाला आहे. या काळात 2008 च्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागला, तर 2020-21 मध्ये कोरोनाच्या भयंकर उद्रेकाचा सामना केला. या संकटातून बाहेर पडून सेन्सेक्सने अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि आज एक नवा टप्पा गाठला आहे. त्यामुळे हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, काल सोमवारच्या व्यवहारादरम्यान बँक निफ्टीने आपल्या नवीन सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. व्यापक बाजारपेठेत, बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.26 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. दुसरीकडे छोट्या समभागांमध्ये थोडा दबाव होता. स्मॉलकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांनी घसरला होता. Stock Market Today|
व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 494.28 अंकांनी किंवा 0.67% ने वाढून 74,742.50 वर बंद झाला होता. व्यापारादरम्यान सेन्सेक्सने 74,869.30 चा नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला होता. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 152.60 अंकांच्या किंवा 0.68% च्या वाढीसह 22,666.30 वर बंद झाला. व्यवहारादरम्यान निफ्टीने 22,697.30 अंकांच्या नव्या शिखरालाही स्पर्श केला.
हेही वाचा:
सोनं – चांदी महागलं..! गुढी पाडव्याच्या दिवशी ग्राहकांना बसणार फटका वाचा तुमच्या शहरातील ‘भाव’