जामखेड -पुणे येथील बांधकाम व्यासायिक हाजी नूर सय्यद, दहशतवाद विरोधी पथकचे अधिकारी अजित मदने व युवा नेते सोहेल पठाण यांच्या वतीने शहरातील 40 गरजू, निराधार व विधवा महिलांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप करण्यात आले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांतील अनेकांच्या हातचे काम सध्या बंद आहे. विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गरीब व गरजू चाळीस कुटुबांची माहिती घेऊन युवा नेते सोहेल पठाण यांनी पुढाकार घेऊन पुणे येथील बांधकाम व्यावसायिक हाजी नूर सय्यद, दहशतवाद विरोधी पथकचे अधिकारी अजित मदने यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ चाळीस कुटुंबांना किराणा किट वाटपाचे नियोजन केले. तसेच शहरातील अशा महिलांना या काळात कसल्याही प्रकारचे उपजीविकेचे साधन नाही, त्यांना ही मदत करण्यात आली आहे. यावेळी पठाण, जमीर सय्यद, अशोक हुलगुंडे, वेदांत दळवी, संजय फुटाणे, पत्रकार ओंकार दळवी उपस्थित होते.