ग्रेटा थनबर्ग रिटर्न ! दिशा रवीच्या समर्थनार्थ आणखी एक ट्विट; म्हणाल्या, लोकशाहीत…

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग पुन्हा एकदा या प्रकरणाचे समर्थन करणारे वक्तव्य केले आहे. मात्र यावेळी त्यांनी टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेवर प्रथमच भाष्य केले आहे. दिशाच्या अटकेवरून ग्रेटाने लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली.

बंगळुरूतील दिशा रवी या कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी रविवारी तिच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील पटियाला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं दिशाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, दिशाच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गने पहिल्यांदाच ट्विट केले आहे.

“अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र येऊन शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा वादातीत मानवाधिकार आहे. हे कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अंग असायलाच हवेत,”, असे ग्रेटाने ट्विट करून म्हटले आहे.

दिशा रवी हिच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासाबाबत काही माध्यमांनी दिलेले वृत्त सनसनाटी निर्माण करणारे आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे सूचित होत आहे, असे मत व्यक्त करत दिशाची दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याआधी तिची पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. ती मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केले तेव्हा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी तिची तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.